रेल्वेखाली एकाचा मृत्यू; आत्महत्या की अपघात कारण अस्पष्ट

Foto

औरंगाबाद: करंजगाव ते लासुरगाव दरम्यान एकाचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा अपघात आहे की आत्महत्या हे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. 

चांगदेव कचरु नळे (वय- 28 वर्ष रा. लासुरगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृताचा भाऊ शेषराव कचरु नळे यांनी दिलेल्या माहितीनुसार चांगदेव हा शेतात पाऊस येत असल्याने पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. सकाळी उठून पाहिले असता तो शेतात आढळून आला नसल्याने त्यांनी शोधा-शोध करणे सुरु केले. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यात चांगदेव नळे बेपत्ता असल्याबाबत तक्रार दिली. आज  पोलिसांना करंजगाव ते लासूर स्टेशन दरम्यान पटरीवर अज्ञात इसमाचे शव आढळून आले. सदरील प्रेत हे चांगदेव नळे याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चांगदेव नळेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लासूर आरोग्य केंद्रात नेले. या प्रकरणी सिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.